Malegaon Sugar Factory Vastav EP 175 : माळेगावसाठी इतका आटापीटा का? बारामतीतून ग्राउंड रिपोर्ट
Malegaon Sugar Factory Vastav EP 175 : माळेगावसाठी इतका आटापीटा का? बारामतीतून ग्राउंड रिपोर्ट
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
सहकार चळवळीच्या माध्यमातून ज्यांच राजकारण उदयास आलं, जी राजकीय घराणी पुढे आली, त्यातील अनेकांनी पुढं हा सहकारच मोडीत काढला आणि स्वतःचे खाजगी कारखाने उभारले, असं असताना काही सहकारी साखर कारखाने उत्तम रीतीने सुरू आहेत. या कारखान्यांचा परिणाम स्थानिक राजकारणावरती तर होतोच, त्याचबरोबर हे कारखाने उसाला चांगला दर देत असल्यामुळे त्याचा परिणाम भोतालच्या खाजगी साखर कारखान्या. वरती देखील होत असतो. बारामतीची निवडणूक सध्या चर्चेत आहे ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने आणि हा माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामतीच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये देखील असाच प्रभाव टाकून आहे आणि म्हणूनच बारामतीच्या या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची ठरते आहे. या माळेगावसाठी आटापिटा होताना आपण पाहतो आहोत. माळेगाव सहकारी साखर कारखाना. बारामती तालुक्यातील मात्र या साखर कारखान्याच्या भोताली किती खाजगी साखर कारखाने उभे राहिलेत गेल्या काही वर्षांमध्ये हे आपण जर पाहिलं तर दौन शुगर, अंबालिका शुगर, बारामती ऍग्रो, जरंडेश्वर, शरी ग्रो, दत्त इंडिया जो आधी फल्टन सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जात होता, जवाहर शुगर जो आधी श्रीराम सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जात होता, भीमा पाटस जो आता निराणी शुगरून हलवला जातो आहे आणि श्रीनाथ मस्कोबा तर बारामती बरोबरच इंदापूर असेल, दौंड असेल, फलटन असेल, त्याचबरोबर पुरंदरचा काही भाग असेल अशा वेगवेगळ्या भागांमध्ये हे खाजगी साखर कारखाने उभे राहिलेत आणि जर या माळेगाव सहकारी साखर कारखान्यानी उसाला चांगला दर दिला शेतकऱ्यांना तर या आजूबाजूच्या खाजगी साखर कारखान्यांना देखील चांगला दर देणं. क्रमप्राप्त ठरत, एका अर्थाने या कारखान्यांवरती दबाव येतो.