Aurangabad : औरंगाबादमध्ये जामिनावर सुटकेनंतर आरोपीची धुमधडाक्यात मिरवणूक
औरंगाबादेत अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात असलेल्या आरोपीची जामिनावर झालेल्या सुटकेनंतर मिरवणूक काढण्यात आली. टाऊन हॉल ते आसेफिया कॉलनीच्या दरम्यान आरोपीची मिरवणूक काढण्यात आली. या आरोपीचे ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले. आरोपीला त्याच्या घरापर्यंत नेण्यात आले. मिरवणुकीत स्वागत स्वीकारणाऱ्या आरोपीचे नाव अकबर अली रा. आसेफिया कॉलनी असे आहे. आरोपींच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.