Aurangabad : प्रवेश जिल्हा परिषद शाळेत, हजेरी मदरशांमध्ये; औरंगाबादमधील धक्कादयक चित्र
Continues below advertisement
शाळाबाह्य मुलांचा शोध घेत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही विद्यार्थी शाळेच्या वेळेत मदरशांमध्ये जात असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या पाहणीत समोर आली आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सर्व तालुक्यांच्या पंचायत समिती आणि गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून अशा विद्यार्थ्यांची माहिती सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेची तपासणी करताना गैरहजर असलेले विद्यार्थी त्या वेळेत मदरशात जाऊन शिक्षण घेत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने दोन टप्प्यांत सर्वेक्षण केले असता जिल्ह्यात 1244 शाळाबाह्य मुले असल्याचे समोर आले होते.
Continues below advertisement