Online weapons selling | ऑनलाईन शस्त्रांची विक्री तातडीनं बंद करा; औरंगाबादच्या तरुणाची मागणी | ABP Majha

देशभरात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शस्त्रांची विक्री सर्वात घातक ठरु शकते. ही विक्री तातडीनं बंद करा अशी मागणी याचप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या औरंगाबादेतील एका तरुणानं केलीय. काही महिन्यांपूर्वी औरंगाबादेत ऑनलाइन शस्त्र खरेदीचं प्रकरण गाजलं होतं. यामध्ये काही तरुणांना अटकही झाली. मात्र, आजही बिनदिक्कतपणे शस्त्र ऑनलाईन माध्यमातून घरपोच मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. दरम्यान, अशी कुठलीही शस्त्रविक्री होत असल्यास कठोर कारवाईचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola