ABP Majha Impact : Aurangabad : नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने अनुभवली माणुसकीची दिवाळी

Aurangabad : काल माझानं दाखवलेल्या एका बातमीनं महाराष्ट्र गहिवरला.... राज्यभर दिवाळीचा उत्साह असताना राज्यातल्या काही भागात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पावसानं पीक हिरावल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. औरंगाबादमधल्या शेतकऱ्याची अशी वेदनादायी कहाणी काल माझानं दाखवली आणि अनेकांचं ह्रदय हेलावलं.... शेतकऱ्याच्या मुलाच्या शब्दांनी सुन्न झालेल्या दानशूर व्यक्तींनी तातडीनं या शेतकऱ्याला मदतीचा हात दिला.... आणि या ओलाव्यानं शेतकरी कुटुंबही गहिवरलं.... आज माझाची टीम या शेतकऱ्याच्या घरी मदत घेऊन पोहोचलीय..... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola