Aurangabad : कोविड वॉर्डात राहा, 10 हजार मिळवा! औरंगाबादमध्ये बोगस कोरोना रुग्णांच रॅकेट
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्ण मोकाट आणि बोगस रुग्ण रुग्णालयात असा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी दोन पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांच्या जागी उपचार घेणारे दोन बोगस रुग्ण आणि मध्यस्थी करणारे दोघे अशा सहा आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सिद्धार्थ गार्डन पाहण्यासाठी आलेले दोन तरुण चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये न जाता दोन तरुणांना प्रत्येकी १० हजार रुपये देऊन रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पोलीस तपास करत आहेत.
Continues below advertisement