Aurangabad Old Coins: ऐतिहासिक नाण्यांचा पंचनामा सुरु, प्रियदर्शनी उद्यानात सापडली नाणी ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबाद शहरातल्या प्रियदर्शनी उद्यानात ऐतिहासिक दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वींची नाणी सापडली आहेत. जवळपास २ किलो वजनाची हजारपेक्षा जास्त नाणी सापडल्याची माहिती आहे. प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काम सुरु आहे. स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी ही नाणी सापडली आहेत. १६८०, १८५४ आणि १८८१ काह असं काही नाण्यांवर लिहिलेलं दिसतंय. जेसीबीनं खड्ड्याचं खोदकाम पूर्ण झाल्यानंतर मजुराला त्यातील माती काढताना टोपल्यांमध्ये नाणी सापडलीत. आणखी नाणी सापडण्याचीही शक्यता आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी कार्यालय,  महानगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त पंचनामा सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram