Aurangabad : G20 परिषदे निमित्त औरंगाबादेत 456 फूट लांब आणि सात फूट उंचीचं वारली चित्र
Continues below advertisement
जी- 20 परिषदच्या निमित्ताने औरंगाबाद महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या सहकार्याने वारली चित्र साकारण्यात आलंय... या वारली चित्राचं वैशिष्ठ्य म्हणजे हे 456 फूट लांब आणि सात फूट उंच आहे.... एकूण 3200 चौरस मीटरच्या भिंतीवर हे सर्वात मोठं वारली चित्र साकारण्यात आलंय. यासाठी पालघरमधील द धवलेरी ग्रुपच्या सहा महिला चित्रकार औरंगाबादला आल्या होत्या.... या सहा चित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली 120 महिलांनी अवघ्या सहा तासांत हे चित्र साकारून विश्वविक्रमाला गवसणी घातलीय.... या आनंददायी आणि सर्वात मोठ्या वारली चित्राचं आणि कलाकारांचं औरंगाबादमध्ये कौतुक होतंय...
Continues below advertisement