Man Swallows Toothbrush | औरंगाबादमध्ये तरुणाने टूथब्रश गिळला, शस्त्रक्रियेद्वारे ब्रश काढण्यात यश
लहान बाळाने खेळताना रुपयांची नाणी, फळांच्या बिया, पिन खाल्ल्याचं आपण ऐकलं असेल. पण औरंगाबादेत एका 33 वर्षीय व्यक्तीने चक्क लांबलचक टूथब्रश गिळला. त्यामुळे पोटात वेदना होऊ लागल्याने त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या व्यक्तीने टूथब्रश गिळल्याचं सिटीस्कॅनमधून लक्षात आलं. त्याच्यावर घाटी रुग्णालयात तात्काळ शस्त्रक्रिया करुन पोटातून टूथब्रश बाहेर काढण्यात आला. सध्या या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे.