Aurangabad : आयकर अधिकाऱ्याचं सोंग घेऊन 60 लाखांची खंडणी मागणाऱ्या त्रिकुटाला अटक : ABP Majha
Continues below advertisement
Aurangabd : ज्या प्रमाणे स्पेशल छब्बीस चित्रपटात अक्षय कुमार आणि त्याची गँग बड्या व्यापाऱ्यांना हातोहात गंडवते, त्याच प्रमाणे औरंगाबादमधल्या त्रिकुटानं एका व्यावसायिकाला गंडा घालण्याची शक्कल लढवली होती. मात्र डाव तडीस जाण्यापूर्वीच त्यांच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्यात. आरोपींनी स्वतःला
आयकर विभागाचे अधिकारी भासवून औरंगाबादच्या व्यावसायिकाकडे 60 लाखांची खंडणी मागितली. मात्र व्यावसायिकाला संशय आल्यानं त्यानं पोलिसांकडे धाव घेतली.. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक हॉटेल चालक, दुसरा ब्रोकर तर तिसरा एलआयसी एजंट आहे..
Continues below advertisement