Aurangabad शहर मराठवाड्याचं 'रेल्वे इंजिन' : Raosaheb Danve

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहिल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. औरंगाबादमध्ये आयाोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 

मुंबई-नागपूर बुलेट हा प्रोजेक्ट राज्यासाठी महत्वाचा ठरेल आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी आपले वजन वापरून त्यासाठी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दानवे जर पुढाकार घेत असतील तर राज्य सरकार त्याच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल असंही ते म्हणाले. रुळ सोडून धावू शकत नाही म्हणून मला रेल्वे आवडते असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola