Aurangabad : गाडी चालवताय? हे नक्की पाहा, किरकोळ कारणसुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकतं ABP Majha

गाडी चालवताय हे नक्की पाहा! किरकोळ कारणसुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकतं, गाडी चालवताना नेमकी कशी काळजी घ्याल? पाहा माझाचा हा खास रिपोर्ट. 

दरम्यान, वाहन चालवताना केवळ वाहतुकीचे नियम पाळणं पुरेसं नसतं तर गाडीच्या आत चालकाला अडथळा येऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. तसं न झाल्यास जीवावर बेतू शकतं... यवतमाळच्या पुसदमध्ये अशीच एक घटना घडली आहे. आणि या अपघातात ३ जणांना जीव गमवावा लागलाय. मध्यप्रदेशमधून एका चारचाकी गाडीमधून काही जण पुसद इथे लग्नासाठी स्थळ पाहायला येत होते. पुसद जवळच्या खंडाळा घाटात चालकाच्या पायाजवळ पाण्याची बाटली आली. या बाटलीमुळे गाडीचा ब्रेक लागू शकला नाही.. आणि चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. आणि गाडी फरपटत एका मोठ्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता. की त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola