BJP Issue | भ्रष्टाचार उघड करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार-खासदारांमध्ये जुंपली | ABP Majha
भ्रष्टाचार उघड करण्याच्या मुद्द्यावरुन भाजपच्या आमदार आणि खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर आहेत, असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला आहे. तर चिखलीकर भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामावरुन भाजपच्या बंब आणि चिखलीकर यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर आता पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.