Aurangabad Banner: ओरंगाबाद शहरात '..बायको पाहिजे'चा बॅनर लावणं महागात ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद पालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशी बॅनरबाजी करणं रमेश पाटील यांना भोवलंय. रमेश पाटील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनधिकृत बॅनरप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे असं बॅनर पाटील यांनी लावलं होतं. या बॅनरची चर्चा औरंगाबादमध्ये सुरु होती. भाजपच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांनी शाईफेक करत हा बॅनर फाडला होता. तसंच बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्य़ाची मागणी महिला कार्यकर्त्यांनी केलीय..
Continues below advertisement
Tags :
Election Candidate Banner Aurangabad Municipal Corporation Ramesh Patil Shaifek Wanted Wife Filed Crime Unauthorized Banner