Aurangabad 30-30 Scam Audio Viral : संतोष राठोडचं नातेवाईक आणि गुंतवणूकदारांशी फोनवरचं संभाषण समोर
Continues below advertisement
आणि आता बातमी औरंगाबादेतील ३०-३० स्कॅम प्रकरणाची.. समृद्धीसह इतर प्रकल्पांमध्ये जमिनी गेल्यामुळे ज्यांना त्याचा मोबदला मिळालाय अशा शेतकऱ्यांना हेरून हा कोटयवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन उर्फ संतोष राठोड सध्या हर्सुल कारागृहात आहे. आता मात्र या प्रकरणात एक नवं ट्विस्ट आलंय. या घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू झाल्यानंतर संतोष राठोडने फोनवरून नातेवाईक आणि गुंतवणूकदारांशी चर्चा केलीय.त्याची ऑडिओ क्लिपही 'एबीपी माझा'च्या हाती लागलीय.. या ऑडिओ क्लिपची चौकशी सुरु झालीय.
Continues below advertisement