Aurangabad : Tomato उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या, 1-2 रुपये भाव मिळाल्याने निराश होऊन टोकाचं पाऊल
Continues below advertisement
औरंगाबाद : टोमॅटो उत्पादक शेतकरी आज संकटात सापडला आहे. आधीच कोरोनाचं संकट त्यात हजारो रुपये खर्चून उभं केलेल्या टोमॅटो पिकाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आज औरंगाबाद येथील एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने टोमॅटोला 1 ते 2 रुपये भाव मिळाल्याने आत्महत्या केली आहे.
टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. मात्र भाव मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील परसोडा गावात ही घटना घडली आहे. राजू बंकट सिंह महेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
Continues below advertisement