2008 मधील Chand Nawab व्हायरल व्हिडीओ, 46 लाखापासून नवाबच्या व्हिडीओला बोली लागणार

Continues below advertisement

पाकिस्तानातील कराचीचा पत्रकार चांद नवाब 2008 मध्ये यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे चांगलाच चर्चेत आला होता. चांद नवाब यांनी हा व्हिडिओ नॉन-फंगिबल टोकन म्हणून फाउंडेशन अॅपवर लिलावासाठी ठेवला आहे. एनएफटी हे व्यासपीठ आहे ज्यावर निर्माते डिजिटल प्रॉपर्टीद्वारे पैसे कमवतात. त्याची किमान किंमत 20 इथेरियन टोकन म्हणजे 63  हजार 604 डॉलर्स आहे. भारतीय चलनात ही किंमत 46 लाख 74 हजार रुपये एवढी आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाना व्हायरल झाला होता. लाखो नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिली होती. त्यामुळे चांद नवाब रातोरात प्रसिद्ध झाला होता. हा व्हिडिओची दखल बॉलिवूडने देखील घेतली होती. बजरंगी भाईजान या चित्रपटातील पत्रकाराची भूमिका बजावत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा संवाद या क्लिपवर आधारित आहे. आता चांद नवाबच्या या व्हिडिओचा लिलाव होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram