
Cabinet of Ministers : राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीकडे लक्ष ABP MAJHA
Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं ओबीसी वर्गाच्या राजकीय आरक्षणावर पुन्हा एकदा गदा आली आहे. त्यामुळं अडचणीत सापडलेलं महाविकास आघाडी सरकार आता कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज एक महिना पूर्ण होतोय. मात्र संपावर पूर्णपणे तोडगा निघालेला नाही.. त्यामुळं राज्य सरकार मेस्मा कायद्यातंर्गत कारवाईचा बडगा उचलणार का? याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. तसंच ओमायक्रॉनचं सावट असताना शाळांबाबतच्या निर्णयाची पालक आणि विद्यार्थ्यांनाही प्रतीक्षा आहे. त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
Continues below advertisement
Tags :
Supreme Court Government Meeting सर्वोच्च न्यायालय सरकार State Cabinet राज्य मंत्रिमंडळ Mahavikas Aghadi Political Reservation OBC Class राज्य मंत्रिमंडळ