Sanjay Raut : संजय राऊत संध्याकाळी प्रियंका गांधींना भेटणार ABP MAJHA
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आज संध्याकाळी ते प्रियंका गांधी यांना भेटणार आहेत. शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नाचं उत्तरही राऊत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून देणार आहेत. विरोधकांची एकच आघाडी असावी अशी आग्रही भूमिका राऊत यांनी वारंवार मांडली आहे. ममता बॅनर्जींनी मुंबई भेटीत यूपीएबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली असताना राऊत यांनी काल राहुल गांधी यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा एकाच आघाडीची भूमिका मांडली
Tags :
Shiv Sena Sanjay Raut Uddhav Thackeray Rahul Gandhi Congress Leader शिवसेना Priyanka Gandhi उद्धव ठाकरे संजय राऊत राहुल गांधी काँग्रेस नेते Shiv Sena Leader संजय राऊत UPM Shiv Sena Party Chief