Kokan Rain Update : कोकणाला असनी चक्रीवादळाचा धोका?, नागरिकांनी घाबरु नये , प्रशासनाचं आवाहन
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. त्यातच कोकणात अस्नी चक्रीवादळाचा धोका असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र कोकणाला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलंय. येत्या दोन-चार दिवसांत कोकणाला चक्रीवादळाचा धोका आहे, अशी चर्चा आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलंय. यापूर्वी 'निसर्ग' आणि 'तौक्ते' या चक्रीवादळांमुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांची घरे आणि उत्पन्नाचे साधन असलेली आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या.