Anvay Naik Case | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींचा उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात शुक्रवारी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार यात रिपब्लिक वृत्त वाहीनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींसह कंत्राटदार फिरोझ शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींविरोधात याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोप लावण्यात आले आहेत. या 1914 पानी आरोपपत्रात रायगड पोलीसांकडून एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.
Tags :
Anvay Naik Suicide Arnab Arrest Republic Bahrat Arnav Goswami Anvay Naik Arnab Goswami Majha Vishesh Naik Republic Tv