औरंगाबादमधील OBC कार्यकर्ता परिषदेत कार्यक्रमात गोंधळ, मंत्री विजय वडेट्टीवार यांचीही उपस्थिती
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी समाजाचे पहिले मराठवाडास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दरम्यान एका वक्त्याने छगन भुजबळ यांच्याबाबत अपशब्द बोलले असा आरोप करीत समता परिषदेचे काही कार्यकर्ते व्यासपीठावर पोहोचून कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर व्यासपीठ आणि विद्यापीठासमोर मोठा गोंधळ उडाला. समता परिषदेच्या कार्यकर्त्याला धक्काबुक्कीही झाली.