Anil Parab: रामदास कदमांच्या आरोपावर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया ABP Majha

शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहेत. स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत, असा आरोप रामदास कदमांनी केला आहे. यावर अनिल परब यांनी मात्र बोलणं टाळलं आहे. अनिल परब यांना यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असं परब यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola