Rutuja Latke moves HC : ऋतुजा लटकेंची उच्च न्यायालयात धाव, आजच निर्णयाची शक्यता Andheri East bypoll
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके, यांच्या उमेदवारीचं भवितव्य आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.. मुंबई महापालिकेनं ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर न केल्यानं, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय.. आणि आजच त्यावर निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे.. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम दिवस आहे. दरम्यान लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याच्या प्रक्रियेत कुणाचाही दबाव नसल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केलंय. दबावापोटी लटकेंचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय.