Umesh Kolhe : उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींनी केली बिर्याणी पार्टी, आरोपींना आसरा देणारे ताब्यात
Continues below advertisement
मुंबई: या प्रकरणात एनआयएने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी मध्ये पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या दोन्ही आरोपींवर कोल्हे हत्याकांडामध्ये सामील इतर आरोपींची मदत करणे आणि हत्येनंतर 'बिर्याणी पार्टी'चा आयोजन केल्याचा गंभीर आरोप एनआयएमार्फत कोर्टात करण्यात आला आहे. यापूर्वी सदर प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 9 आरोपींना उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement