Amravarti : अमरावती बंदचं आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानकडून मागे, पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर येथे एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमावर प्रसारीत केल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. या घटनेचा निषेध म्हणून मोर्शी, दर्यापूर, चांदूरबाजार नंतर आज अमरावती शहर बंदचं आवाहन हिंदुत्ववादी संघटने कडून करण्यात आले होते पण पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय मागे घेतल्याचं सांगण्यात आले..