Ravi Rana on Apologies Bachchu Kadu : माझे शब्द मी मागे घेतो, रवी राणांनी व्यक्त केली दिलगिरी
Continues below advertisement
Maharashtra Politics: अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनीदेखील आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
Continues below advertisement