Nitin Deshmukh ACB Inquiry : एसीबी चौकशीपूर्वी नितीन देशमुख यांची जोरदार शक्तीप्रदर्शन
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एसीबीसमोर हजर झालेत. बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांवरून देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. वाहनांच्या ताफ्यासह आणि शेकडो कार्यकर्त्यांसह नितीन देशमूख अमरावतीत दाखल झालेत... पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर अडवलं असून यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमरावतीकडे जाताना वाटेत जागोजागे त्यांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं.