Navneet Rana - Bachchu Kadu : अमरावतीच्या मैदानावरून बच्चू कडू आणि नवनीत राणा आमनेसामने

Continues below advertisement

Navneet Rana - Bachchu Kadu : अमरावतीच्या मैदानावरून बच्चू कडू  आणि नवनीत राणा आमनेसामने अमरावती लोकसभा मतदार संघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्या होणाऱ्या अमित शाह यांच्या सभेपूर्वीच सायन्सकोर मैदानावरुन राणा आणि कडू यांच्यात वाद निर्माण झाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी सायन्स कोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे. पण त्याच ठिकाणी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी उद्या अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीची जय्यत तयारी पण सुरु करण्यात आल्याने प्रहार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दबाबतंत्राचा बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यास उद्याच्या सभेवर संकट उभे ठाकणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram