Amravati Flood : अमरावतीत खडकाच्या कुंड नदीला पूर, ऐन उन्हाळ्यात नदी दुथडी भरुन
गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुरु असलेल्या कहर तुम्ही पाहताय... पण हा कहर अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीए... आता जी आम्ही तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत ती आहेत अमरावतीची... या दृश्यामधून तुम्हाला पावसाचा तडाखा कसा सुरु आहे याचा अंदाज येईल.. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतीचं काय झालं असेल? याचा विचार करा.... ऐन उन्हाळ्यात अमरावतीच्या खडक्याच्या नदीला अवकाळी पावसामुळं पूर आलाय. खरंतर वरुड तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या जडकामध्ये कुंड नदीला अचानक पूर आला. कुंड नदी ही कलोटी आणि कुमुंदरा या गावांतून महाराष्ट्रामध्ये शिरते. अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नदी दुथडी भरुन वाहू लागली... राज्यात सध्या अवकाळी पावासामुळं अनेक ठिकाणी गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदारामुळं शेतीसह, घरांचं, पोल्ट्री फार्मचं, जनावराचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे