Corona news | अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांसाठी कोविड 19 चे प्रतिबंधात्मक निर्बंध आणखी कडक
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत. या नव्या आणि कडक निर्बंधांअंतर्गत सर्व प्रकारची दुकाने/ आस्थापने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील, सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील, लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील.