Bison Amravati Melghat:पाण्याच्या शोधात जनावरांची भटकंती, गव्यांचा कळप रस्ता ओलांडताना कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement
सध्या उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झालीय. या उष्णतेमुळे मेळघाटातील अनेक नद्यांमध्ये पाणी आटल्यानं प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय.. खरंतर प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही वनविभागाकडे आहे.. जागोजागी पाणवठे बनवले जातात. मात्र यंदा या पाणवठ्यांच्या संख्येतही कमतरता जाणवू लागलीय. अशातच पाण्याच्या शोधात ही मुकी जनावरं भटकतायत. असाच एक गव्यांचा कळप सेमाडोह ते हरीसाल मार्गावर पाहायला मिळाला. या गव्यांना वाट मोकळी करुन देण्यासाठी प्रवासीही काही काळासाठी थांबले.. त्यानंतर या गव्यांनी हा रस्ता ओलांडला.. या गव्यांचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियोवर व्हायरल झालाय.
Continues below advertisement