Amravati Varud APMC Election : वरुड बाजार समितीमध्ये खासदार अनिल बोंडेंची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
Amravati Varud APMC Election : वरुड बाजार समितीमध्ये खासदार अनिल बोंडेंची प्रतिष्ठा पणाला
अमरावती जिल्ह्यात आज दुसऱ्या टप्प्यात सहा बाजार समितीची निवडणूक होत आहे. धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, वरुड, दर्यापूर,अचलपूर आणि धारणी बाजार समितीसाठी मतदान होणार आहे... दरम्यान सर्वांचं लक्ष लागलंय ते चांदुर बाजार आणि अचलपूर बाजार समितीकडे. कारण याठिकाणी आमदार बच्चू कडू यांनी स्वतःच पॅनल उभं केलं असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचं पॅनल उभं आहे.. तर दुसरीकडे वरुडमध्ये भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Continues below advertisement