Amravati : Talegav Dashasar मध्ये चटपटीत कुरकुरीत चिवडा खाण्यासाठी गर्दी ABP Majha

Amravati : Talegav Dashasar मध्ये चटपटीत कुरकुरीत चिवडा खाण्यासाठी गर्दी ABP Majha

मरावतीच्या तळेगाव दशासर येथे जंगी शंकरपट आणी जत्रेला सुरुवात झाली आहे. तळेगाव ज्याप्रमाणे शंकरपटासाठी प्रसिद्ध आहे तितकेच ते इथल्या जत्रेत मिळणाऱ्या कच्च्या चिवड्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. जत्रेत आलेला प्रत्येकजण या चिवड्याची चव चाखल्या शिवाय जात नाही. तळेगाव दशासर येथील जत्रेत विविध प्रकारची दुकानं थाटून छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहेत. मात्र या ठिकाणी सर्वात जास्त चर्चा आहे ती सुरजुसे बंधू यांच्या कच्च्या चिवड्याची. मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, हिरवा पातीचा कांदा आणी कोथिंबीर सोबत तिखट, हळद, कलमी पावडर,धनिया पावडर, जिरं यासारखे पारंपारिक मसाले वापरून हा चिवडा तयार केला जातो. विशेष म्हणजे जत्रेत येणाऱ्या नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या माफक दरात याची विक्री केली जाते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola