Amravati : अमरावतीत शिव महापुराण कथेला सुरुवात, सफाई कामगारांच्या हस्ते पूजन
अमरावतीच्या हनुमान गडी येथे शिवमहापुराण कथेला उत्साहात सुरुवात झाली.. पंडित प्रदिपजी मिश्रा यांचे खासदार नवनीत राणा, महिलांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले..आज शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी सफाई कामगार, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कुली आणि बाजारात काम करणारे हमाल यांच्या हस्ते पूजन करून कथेला सुरुवात झाली.. ही कथा ऐकण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सफाई कामगारांसोबत बसले.