Amravati Graduate Constituency : रणजीत पाटील vs धीरज लिंगाडे यांच्या भांडणात अपक्षांना लॉटरी लागणार?
अमरावती पदवीधर मतदार संघात मुख्य लढत भाजपचे डॉ रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात आहे. मात्र भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्याबद्दल पक्षातूनच नाराजी असल्याची चर्चाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना देखील प्रचंड विरोध पाहायला मिळतोय. काँग्रेसमधून अनेक उमेदवारही इच्छुक होते पण ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार आयात केल्यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळे, या नाराजीनाट्यात एखाद्या अपक्षालाच लॉटरी लागतीय की काय?, अशी कुजबूज रंगलीय.