Uttar Pradesh : निवडणुकीचा प्रचार की कोरोनाचा प्रसार ? मोदीजी यांना कोण आवरणार? : ABP Majha

एकीकडे कोरोनाचं संकट महाराष्ट्रासह देशभरात चिंतेची बाब ठरलीय.. तर दुसरीकडे नेत्यांना मात्र कोरोनाचा विसर पडलाय... उत्तर प्रदेशच्या बरेलीत भाजपच्या जनविश्वास यात्रेत कोरोना चिरडून मरेल... इतकी गर्दी होती, आणि विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात ही जनविश्वास यात्रा होती, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी बैठकांचं सत्र घेतायत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाकडून नियम मोडण्याचे एकापाठोपाठ एक विक्रम करत चालले आहेत... आगामी काळात उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत.. पण जी जनता मतदान करणारेय.. त्या जनतेच्या आरोग्याची सुरक्षा अशा रॅलीमुळे धोक्यात येऊ शकते... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola