अमित शाह नारायण राणेंची इच्छा पूर्ण करणार? अमित शाह महाराष्ट्रात राजकीय फासे पलटवणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Feb 2021 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे अशी इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातोय. पण गेल्या काही दिवसांपासून भाजपने या भागात नारायण राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आजचा अमित शाह यांचा दौरा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.