Covaxin for Children | भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिन लसीची मुलांवर चाचणी होणार!
नवी दिल्ली: भारत बायोटेकच्या Covaxin या कोरोना लसीच्या पहिल्या फेजचा पुनरावलोकन डेटा 'द लॅन्सेट' या सायन्स नियतकालिकेत गुरुवारी प्रसिध्द करण्यात आला आहे. अशा प्रकारचा डेटा प्रकाशित करणारी भारत बायोटेक ही भारतातील पहिलीच कोरोना लस निर्मिती करणारी कंपनी आहे. ICMR नेही या गोष्टीला पुष्टी दिली आहे.