Akola ZP Election | अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित आघाडीची सत्तेकडे वाटचाल | ABP Majha

अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. कारण एकूण 53 जागांपैकी वंचितने 22 जागांवर बाजी मारली आहे. बहुमतासाठी त्यांना 5 जागांची गरज असून चार अपक्ष वंचितला पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. या चार पैकी दोघे जण भारिपचे बंडखोर आहे तर एक जण भारिप समर्थक आहेत. अर्थात वंचितला बहुमतासाठी एक जागेची गरज आहे.  त्यामुळं बहुमत गाठण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना कुणाची साथ मिळते? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसोबडे गावात वंचितनं बाजी मारली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola