School Fees | अकोल्यात शिकवणी, संगणक शुल्क आकारल्यानं पालकांचा संताप, शाळेचे संपूर्ण शुल्क भरण्यास विरोध

Continues below advertisement

अकोल्यातील गीतानगर भागातील सेन्ट अँन्स शाळेविरोधात आज पालक एकवटले आहेत. शाळेकडून पालकांना शाळेचं संपूर्ण शुल्क भरण्याविरोधात पालकांचा विरोध आहे. शाळेनं चौथ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा शुल्कासोबतच शिकवणी शुल्क आणि संगणक शुल्कही आकारलं होतंय. पालकांनी याला विरोध करत शाळेनं फक्त 30 टक्के शिकवणी शुल्क घेण्याची मागणी केलीय आहे. याच मागणीसाठी हे पालक आज शाळेत जमले होते. मात्र, शाळा प्रशासनाने व्यवस्थापनाशी चर्चा झाल्यानंतरच यावर निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. कोरोना काळात सरकारनं शाळांना शुल्क घेण्याला मनाई केलेली असतांना या शाळेनं पालकांना फी भरण्यासाठी आग्रह केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram