Akola Missing Girl Found | अकोल्यातील 'ती' बेपत्ता मुलगी तब्बल सहा महिन्यानंतर सापडली

अकोला : तब्बल सहा महिन्यानंतर अकोल्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आज शोध लागला आहे. आज अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या मुलीला ताब्यात घेतलं आहे. मात्र, मुलीला नेमकं कुठुन ताब्यात घेतलं, हे पोलिसांनी अद्यापही गुलदस्त्यात ठेवलं आहे. मुलगी सापडली असताना आरोपी पवन नगरे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अकोल्यातील ही मुलगी 5 सप्टेंबर 2019 पासून पवन नगरेसोबत बेपत्ता झाली होती. याप्रकरणी अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये पवन नगरेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola