Jammu Kashmir : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ जवान शहीद
Jammu Kashmir : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ जवान शहीद "शरद पवार यांना भेटण्याचा योग उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकदाच आला होता. फॉर्म भरला नव्हता त्याच्या अगोदर एकदा भेटलो होतो. प्रचाराच्या काळात स्टेजवर त्यांच्याजवळ बसण्याची संधी मिळाली. पण तेव्हा बोलण्याची संधी मिळाली नव्हती. जे लोक शरद पवारांना भेटायला जायचे ते सांगायचे की दिंडोरीची जागा निवडून येणार आहे. माझ्यापेक्षा शरद पवारांना ही जागा निवडून येईल याची खात्री होती. ते अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, लोकांशी संपर्क आहे. त्यांच्याबद्दल आपण कितीही बोललं तरी कमीच होणार आहे, असे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. सर्वसामान्य माणूस उमेदवार होऊ शकतो, निवडून येऊ शकतो भास्कर भगरे म्हणाले, निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शरद पवारांना भेटलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. फारकाही बोलता आलं नाही. मात्र, आता साहेबांचा फोन येतो. साहेबांना संसदेत भेटता येतं. शरद पवार त्यांच्याकडे भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला सांगतात. सर्वसामान्य माणूस उमेदवार होऊ शकतो, निवडून येऊ शकतो. याचे उदाहरण असेल तर भगरे सर आहेत. हे कोणी करु शकतं तर पवार साहेब करु शकतात. ऐरणीवर घाव घातले जातात ते सोसण्याची तयारी मी ठेवलीये पुढे बोलताना भगरे म्हणाले, वीस लाख मतदारांचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी दिली आहे. संसदेत जनतेच्या विरोधात तयार होतं असेल तर ऐरणीवर घाव घातले जातात ते सोसण्याची तयारी मी ठेवलीये. म्हणूनच आजपर्यंत मी इथपर्यंत आलो आहे. मला हातोडा मारण्याची वेळ आली तरी मी ती करणार आहे.