Akola Girl Missing case | मुली बेपत्ता होताहेत, पोलिसांचं सहकार्य नाही, पालकांची उच्च न्यायालयात धाव | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
मानवी तस्करीत महिलांच्या बेपत्ता होण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचं 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो' (NCRB )च्या 2019 मधील अहवालानं स्पष्ट झालंय. वर्ष 2019 मध्ये विदर्भातील सहा जिल्ह्यांतून 1 ते 35 वयोगटातील 926 मुली गायब झाल्यात. तर अकोल्यात ऑगस्ट ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल 35 मुली बेपत्ता झाल्यात. यात तपास होत नसल्यानं एका बेपत्ता मुलीच्या वडीलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. उच्च न्यायालयाने थेट अकोला जिल्हा पोलीस अधिक्षकांना दोनदा न्यायालयात हजर होण्याचे फर्मान सोडलंय. मात्र, त्यानंतर तक्रारदार पालकांचीच पोलीसांनी छळवणूक चालवल्याचा आरोप बेपत्ता मुलीच्या वडिलांनी केलाय.
Continues below advertisement