Amol Mitkari Akola : काळे झेंडे दाखवून अजितदादांचा अवमान केला, फडणवीसांनी उत्तर द्यावं

Continues below advertisement

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली पण, इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे. तर महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कठोर भूमिका घेतलीये.

तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली केलीये. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा एक प्रकारे अपमान केल्याचा प्रकार असल्याचे म्हटलंय. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) द्यावे आणि त्यांनी तात्काळ आपली भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी मिटकरींनी केलीय. एक प्रकारे काळे झेंडे दाखवून भाजपला काय पुरुषार्थ साधायचं आहे, भाजपचे याला समर्थन आहे का? असा सवाल ही आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय. भाजपनं तात्काळ याचा खुलासा केला पाहिजे, असेही ते म्हणालेय.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram