Amol Mitkari : हा कुत्रा पुन्हा भुंकला तर सगळं बाहेर काढू, अमोल मिटकरींचा हाकेंना इशारा ABP MAJHA

Continues below advertisement

'मिटकरी ऑन शिंदे गट मंत्री नाराजी :

# अजित पवार निधी देत नाहीये, अशी कुठलेही नाराजी व्यक्त केली नसल्याचे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि मंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलंय.

# जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसवरण्याचं काम केल्या जात आहे, त्यामधून अजित पवार आणि महायुतीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न.

# अजित दादा सर्वाना समान न्याय देणारे आहेत.. निधी वाटपावरून कुठल्याही पक्षातील मंत्र्यांची आमदाराची नाराजी नाही.. निवळ चुकीच्या बातम्या पसवरल्या जातायेत.. त्यामुळं नाराजी असल्याचे कारण नाही, स्वतः शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते तथा मंत्री प्रताप सरनाईक बोलले... असेही ते म्हटले..


मिटकरी ऑन हाके :


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधलाय.. लक्ष्मण हाके यांच्यावर ड्रायव्हरचा 5 वर्षांचा पगार थकवल्याचा आरोप मिटकररींनी केला होता.. या आरोपानंतर लक्ष्मण हाकेच्या काही लोकांकडून ड्रायव्हर सचिन बंडगर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात आहे, असा आरोप मिटकरींनी केलाय.. पाच वर्ष ड्रायव्हर सचिन बंडगर यांच्याकडून निशुक्ल सेवा ककरून घेतली, त्यासाठी हाकेने सचिन याच्या पत्नीला नोकरीवर लावून देण्याचा आमिष केलं होतं, त्यासाठी आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचे मिटकरी म्हटले..

सचिन बंडगर यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभ आहो, त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांच्या केसालाही धक्का लागला तर हाकेचे नकली केस त्यांच्यात हातात ददेऊ, अन त्याच्याच घशात त्याचे दात घालू, असा स्पष्ट इशारा मिटकरींनी हाकेला दिलाय..

दरम्यान, मिटकरींनी हाकेला कुत्रा म्हणून उल्लेख केला.. जर हा कुत्रा पुन्हा भुंकला तर त्याचे सर्व प्रकरण बाहेर काढू, असा इशारा मिटकरींनी दिला आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola