Neelam Gorhe Meeting : नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची बैठक, चाकणकर राहणार उपस्थित
Neelam Gorhe Meeting : नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची बैठक, चाकणकर राहणार उपस्थित
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आलीय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यावर आज चर्चा आहे. बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरही उपस्थित राहतील. मात्र या बैठकीआधी नाराजीनाट्य सुरू झालंय. आयोगावर काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना बैठकीचं निमंत्रणच नाही, यात अकोल्याच्या डॉ. आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे यांना आमंत्रण नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील महिला आयोगाच्या माजी सदस्यांना निमंत्रण नसल्याची माहिती डॉ. आशा मिरगेंनी दिली आहे. आशा मिरगे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्य डॉ. उत्कर्षा रूपवते यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिलाय.