Amol Mitkari यांच्यावर गंभीर आरोप; अकोल्यात राष्ट्रवादीमध्ये गृहकलह
अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या वादाचा तिसरा अंक सुरु झालाय. मिटकरी यांनी त्यांच्यावर झालेले कमिशनखोरीचे आरोप फेटाळून लावताना शिवा मोहोड यांचे चरित्र आणि चारित्र्य तपासावं असा पलटवार केला होता. आता शिवा मोहोड यांनीही मिटकरींवर आणखी गंभीर आरोप केलेत. मिटकरींनी घेतलेला ७० लाखांचा भूखंड आणि ३० लाखांच्या गाडीचा स्त्रोत काय? असा सवाल मोहोड यांनी केलाय. याशिवाय मिटकरींच्या चारित्र्यावरूनही त्यांनी आरोप केलेत. या आरोपांना मिटकरी यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे....