Akola : अकोल्यातील अकोटफैल परिसरात प्रेमविवाहावरुन दगडफेक, दोन गट एकामेकांसमोर आल्याने तणाव
अकोल्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अकोटफैल परिसरात एका प्रेमविवाहावरून दगडफेकीची घटना घडली. दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या लोकांच्या घरावर दगडफेक झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.