Akola Violence : अकोल्यात पोलीस ठाण्याबाहेर दोन गटांत राडा, 10 जण जखमी, तर एकाचा मृत्यू; कलम 144 लागू

Continues below advertisement

अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी आणि फायर ब्रिगेडच्या दोन वाहनांची तोडफोड केलीय. तर काही ठिकाणी चारचाकी गाड्यांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला.  : अकोल्यातील हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे शहरातील एका भागातून एक मोठा समूह चालून आला. या समूहानं संपुर्ण भागात दगडफेक आणि जाळपोळ करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटातील एकूण १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. एका व्यक्तीनं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram